संस्थेच्या स्थापनेस झाली पन्नास वर्षे पूर्ण
शिवशाही वृत्तसेवा खर्डी
खर्डी तालुका पंढरपूर येथे श्री सिताराम महाराज विद्यालय स्थापनेस पन्नास वर्ष झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला. या विद्यालयाने खर्डी व पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच उच्च पदापर्यंत पोहचवले आहे . या संस्थेची स्थापना कै. दादासाहेब शेंडे,कै. भाऊसाहेब कुलकर्णी, कै. अप्पासाहेब उर्फ विठ्ठलराव कुलकर्णी यांनी कै.सुधाकरपंत परिचारक याच्या सहकार्याने 16 डिसेंबर 1971 रोजी या विद्यालयाची सुरुवात केली. आज या विद्यालयात प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.आज 5 वी ते 12 वी पर्यत वर्ग सुरू आहेत. यावेळी प्राचार्य सचिन कुलकर्णी व प्रसाद संत यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाचे योगदान व कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी प्राचार्य एस. व्ही. कुलकर्णी, पर्यवेक्षक सी. बी. रोंगे, सहशिक्षक आर. डी. कांबळे, आण्णा घाडगे , पी. एम. वाघमारे, पी. एम. संत, एस. एस. शेजाळ, एस .आर. सुरवसे, एस. यु. शिंदे, बी. आर. येडगे, जी. एम. मस्के,बी एस. घाडगे, आर. के. जाधव, सुनिल घाडगे, सहशिक्षीका सौ.आर. व्ही. नवले,एस. आर. लोहार,एस. एस. पोरे,जे. एम. गेजगे, एस. एस. जाधव,के. एम. मोरे, बी. एम. बाबर याच्यासह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघमारे यांनी तर प्रास्ताविक व आभार एस एस पोरे यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा