६महिन्यांत ३०० ट्रॅक्टर विक्री - नवा विक्रम शेतकऱ्यांचा हस्ते केक कापून उत्साह साजरा केला
समृद्धी ट्रॅक्टर येथे दुसर्या लकी ड्रॉ बक्षीस वितरण |
पंढरपूर - प्रतिनिधी
समृद्धी ट्रॅक्टर येथे दुसर्या लकी ड्रॉचे बक्षीस वितरण केले. नेहमी शेतकऱ्यांच्या हित जोपासणारी ही संस्था विविध सामाजिक उपक्रम अग्रेसर असते. यावेळी विष्णू चागदेव सरक अनगर- मोटार सायकल गाडी, अहमद रशीद तांबोळी पेनुर 3 ग्रॅम सोने, राजश्री हनुमंत कदम - रोपळे- 2 ग्रॅम सोने देऊन दुसर्या ग्राहक लकी ड्रॉ विजेते ठरले असून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी दिवाळीसाठी खास ऑफर देत दोन चाकी मोटार सायकल, सोने नाणी अशा विविध बक्षीस ठेवण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहनसमृद्धी ट्रॅक्टरचे श्री.अभिजीत कदम यांनी केले. यावेळी पळशीचे प्रगतीशील बागायतदार हणमंत बापू पाटील, शोरूमचे मॅनेजर श्री.सोमनाथ केसकर, सोनालिका कंपनीचे श्री.साहिल शिंगला सर, श्री.सुरेंद्र ठाकूर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा