मंगळवेढा पंढरपूर रोडवर सकाळी ८ वाजता घडलेला प्रकार
मंगळवेढा प्रतिनिधी - राज सारवडे
सकाळी मित्रांबरोबर व्यायामासाठी गेलेल्या मुलांपैकी दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे मंगळवेढा पंढरपूर रोडवरील सुगरण हॉटेल जवळ ही घटना घडली
दिनांक 12 ऑगस्ट रोजी मंगळवेढ्यातील काही मित्र रोजच्या प्रमाणे व्यायाम करण्यासाठी केले शादाब अमजद रजीवली आणि प्रज्वल हेमंत लोहार हे दोघे त्यांच्या आणखी काही मित्रांबरोबर पंढरपुर रोडवर व्यायामासाठी गेले होते व्यायामानंतर मंगळवेढा पंढरपुर रोडवरील सुगरण हॉटेल च्या समोरील शेततळ्यावर हे सर्वजण गेले त्यावेळी शादाब आणि प्रज्वल शेततळ्यात गुरु लागले सर्वजण दहा ते बारा वयोगटातील मुले असल्याने ते बुडत आहेत हे त्यांच्या लवकर लक्षात आले नाही आणि बराच वेळ गेला त्यामुळे या दोन निरागस मुलांचा मृत्यू झाला सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे मंगळवेढा परिसरात दुःखाची लाट पसरली आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा