पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत
![]() |
स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांना धनादेश देताना अभिजीत पाटील |
पंढरपूर: प्रतिनिधी
धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन व पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा १ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिजीत पाटील यांची सामाजिक कार्याची आवड व सामाजिक भान संपूर्ण तालुक्याला परिचित आहे. प्रत्येक संकटाच्या काळात भक्कमपणे पाऊल टाकले आहे. देशासह महाराष्ट्रात कोवीडच्या काळात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने आपल्या कारखान्यात ऑक्सिजन प्रकल्प उभा करून सबंध महाराष्ट्रात ऑक्सिजन मॅन म्हणून ओळख झाली अशा सामाजिक बांधिलकीतून आपल्या वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी MPSC च्या नेमणुका न मिळाल्याच्या तणावाने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला. लोणकर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.याची जाणीव ठेवून अभिजीत पाटील यांनी एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश स्वप्निल लोणकर यांच्या वडिलांच्या हातात सुपूर्द केला.
लोणकर घरात एकूलता एक तरूण मुलगा गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मदत केली.असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा