maharashtra day, workers day, shivshahi news,

नूतन मराठी माध्यमिक विद्यालय, मंगळवेढा - जागतिक पर्यावरण दिन साजरा

नूतन मराठी माध्यमिक विद्यालय, मंगळवेढा

जागतिक पर्यावरण दिन ,ऑनलाइन पद्धतीने साजरा 

Nutan highschool mangalwedha, shivshahi news
चित्रकला उपक्रम अंतर्गत सानिका कसगावडे हिने वृक्षारोपणचा दिलेला संदेश


मंगळवेढा - (प्रतिनिधी) राज सारवडे

सध्याच्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या मध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नूतन मराठी माध्यमिक विद्यालय,मंगळवेढा या प्रशालेच्या वतीने विविध उपक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबर पर्यावरण संरक्षणा च्या जागृतीसाठी जागतिक पर्यावरण दिन हा ऑनलाइन साजरा करण्यात आला.  

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही आपलीच जबाबदारी : गुरनिंग बंडगर 

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी वृक्षारोपण करून करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकासोबत त्याच्या आजी आजोबांनीसुद्धा पुढाकार घेतला.ज्यामध्ये कांताबाई गणपत बांदल यांनी वड, लिंबू ही झाडे लाऊन कार्यक्रमची सुरवात केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहशिक्षक योगेश कुलकर्णी यांनी पर्यावरण दिन साजरा करण्याची पाश्वभूमी, परिसंस्थेमधील विविध घटकाचे महत्व सांगून विद्यार्थी व पालकांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. 

यावेळी शोएब सुतार,समर्थ जाधव,नागेश काशीद,सारिका अंकलगी,साक्षी फटे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संरक्षणसंबंधित मनोगते व्यक्त केली.

आपले पर्यावरण माझी जबाबदारी या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धेत इ ८ मधून ज्ञानेश्वरी नामदेव पवार,

पियुष महादेव दवले,इ ९ वी निबंध स्पर्धेत समीक्षा नाना ढाणे,प्राजक्ता प्रकाश इंगळे,निखिल भीमराव कदरकर

चित्रकला स्पर्धेत सलोनी ज्ञानेश्वर शिंदे,विशालाक्षी प्रकाश कालूंगे, निकिता काशिनाथ वठारे,इ १० वी निबंध स्पर्धेत भारती काशीनाथ वठारे,श्रेया सुहास जोशी,सिद्धी गणेश माळी,साक्षी दत्तात्रय फटे,मारुती संतोष दवले समृद्धी शिवाजी कोंडुभैरी

चित्रकला स्पर्धेत त्रिशा अरुण बांदल,प्राजक्ता सुभाष पवार,सायली सुरेश लंगडे,सानिका संतोष कसगावडे,सृष्टी तुकाराम पाटील

मारुती संतोष दवले या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर यांनी पर्यावरण दिन हा ५ जूनला साजरा न करता वर्षभर साजरा केला पाहिजे.वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे असे सांगून वनस्पतीचे महत्व,भविष्यकाळाच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणातील विविध घटकांचे महत्व विशद केले.वृक्षारोपण करता आले नाही तर वृक्षसंवर्धन करा असे आवाहन त्यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षिका अवंती पटवर्धन यांनी करताना विविध वृक्षाचे महत्व,सीड बॉल, वृक्षारोपण सुरक्षित ठिकाणे,पर्यावरण दूत यासारख्या विविध घटकावर आधारित कार्यक्रम उत्कृष्टपणे संपन्न केला.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा आर एन कुलकर्णी,उपाध्यक्षा निर्मलाताई पटवर्धन,सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी,संचालक आप्पासाहेब महालकरी,सुरेश जोशी,मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर त्याचबरोबर सर्व संचालक,संचालिका,पालक गुरुलिंग पाटील यांनी कार्यक्रम आयोजक सहशिक्षिका अवंती पटवर्धन व सहशिक्षक योगेश कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी,पालक ऑनलाइन उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !