त्या शिवसैनिकांवर कारवाई
होणार का ? सामान्य पंढरपूरकराचा सवाल
![]() |
शिवसैनिकांनी कटेकर यांना काळे फासले |
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबंधात बदनामीकारक व्यक्तव्य केले म्हणून शिवसैनिकांनी कटेकर यांना जाब विचारत तोंडाला काळे फासले माफी मागण्यास भाग पाडले हा सर्व प्रकार चालू असताना स्वतःला ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या एका शिवसैनिकाने कटेकर यांना मागून लाथ मारली व त्याचे अनुकरण करत इतर काही जणांनी कटेकर यांना बेदम मारहाण केली. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण झाले आहे शिवसेनेचे विद्यमान पदाधिकारी व शहरातील कार्यकर्ते कटेकर यांना मारहाण करण्याच्या विरुद्ध होते.मात्र या जेष्ठ शिवसैनिकांने मारहाण करण्यास सुरुवात केल्यावर इतर काही जणांनी गर्दीत घुसून हात धुऊन घेतले कटेकर यांचे वादग्रस्त विधाना वरून शिवसैनिकांना राग येणे स्वाभाविक आहे पण त्यांना मारहाण करणे उचित नव्हे एका जेष्ठ व वयस्क पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात अशा पद्धतीने जमाव जमवून मारहाण करणे गंभीर बाब आहे विशेष बाब म्हणजे ज्या ज्येष्ठ शिवसैनिकाने कटेकर यांना लाथ मारली तो शिवसैनिक पंढरपूर नगरपालिकेचा ठेकेदार असून नगरपालिके वर भाजपाची सत्ता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष व बहुतेक सर्व नगरसेवक हे भाजपचे आहेत तर आमदार प्रशांत परिचारक हे भाजपचे सहयोगी आमदार असून जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर सोपवली आहे. असे असताना यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या नगरपालिकेतील ठेकेदार भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना मारहाण करत असेल तर गंभीर बाब आहे विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या भाजपच्या पदाधिकारी निवडीत ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलून परिचारक यांनी स्वतःच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली पंढरपूर शहर भाजपचे अध्यक्ष देखील नगरसेवक असून तेदेखील मारहाण करणारे बाबत मुग गिळून गप्प आहेत त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या भाजपात जेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते सुरक्षित नाहीत असा अर्थ काढला जात आहे शिवसेनेचा हा माजी पदाधिकारी अनेक पक्षात फिरत असून फिरत असून त्याने शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लडविली होती काही दिवसांपूर्वी तो मनसेतून सेनेत आला होता
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा