प्रसिद्ध कवी आणि सामाजिक कार्यकर्ते रवि वसंत सोनार यांना पितृ शोक
पंढरपूर - येथील प्रसिद्ध कवी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते रवि वसंत सोनार यांचे वडील वसंतराव अनंतराव सोनार ( दहिवाळ ) यांचे आज दिनांक १३ रोजी सायंकाळी ८.१५ वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले ते ८२ वर्षाचे होते.
कै. सोनार हे रेल्वे पोलीस दलातून निवृत्त झाले होते. गुरुवारी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु वृद्धापकाळामुळे त्यांच्यावर उपचार लागू पडले नाहीत आणि आज दिनांक १३ रोजी रात्री ८. १५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात कवी रवी सोनार यांच्यासह ४ मुले १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे . रविवारी दिनांक १४ रोजी सकाळी ७ वाजता वसंत नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा