पेट्रोल डिझेल चा पुन्हा भडका
पेट्रोल , डिझेल सलग साहव्यांदा वाढ
नवी दिल्ली - ( प्रतिनिधी ) पेट्रोल आणि डिझेल दरात रविवारी 30 पैशाची वाढ झाली.नवीन दरानुसार राजधानी दिल्लीत पेट्रोल दरात लिटरमागे 29 पैशांनी वाढ होऊन तो 88. 73 रुपये लिटर पर्यंत पोहोचला आहे. डिझेलचे दर 32 पैशांनी वधारल्याने ते 79 .06 रुपयांवर पोहोचले आहे.गतवर्षी 1 ते 20 जानेवारी दरम्यान मुंबई पेट्रोलचे दर 81 .04 रुपये , कोलकत्ता 78.04 तसेच दिल्लीत 75.45 रुपये होते. तर फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई, कोलकत्ता तसेच दिल्ली पेट्रोलचे दर अनुक्रमे 95.21,90.01, तसेच 88.73 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून सतत दरवाढ होत आहे.
मध्यप्रदेशात पेट्रोल सर्वाधिक महाग
मध्य प्रदेशात पेट्रोलच्या किमती ने शंभरी गाठली आहे. राज्याची राजधानी भोपाळमध्ये पावर पेट्रोल शंभर रुपये दराने विक्री केले जात आहे.सामान्य पेट्रोलचे दर 96 रुपये तर डिझेलची किंमत 86 रुपये 84 पैसे झाली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा