शेतकऱ्याचं पशुधन वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करा
मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांची पशुसंवर्धन मंत्री ना.सुनील केदार यांच्यासह पालकमंत्री ना. भरणे यांच्याकडे मागणी
![]() |
पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांना निवेदन देताना मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी |
प्राथमिक आरोग्य केंद्रप्रमाणे किमान कंत्राटी वर तरी भरती करण्याची मांडली सूचना
पंढरपूर - प्रतिनिधी (कबीर देवकुळे) सोलापूर जिल्हा हा शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर जीवन जगत आहे. अशातच जनावरे पाळून दूध व्यवसायही मोठया प्रमाणात चालू आहे. परंतु याच जिल्ह्यातील जनावरसाठी आवश्यक असणाऱ्या दवाखान्यातील प्रमुख पदे रिक्त असल्याने या भागातील जनावरांना उपचारासाठी मोठया अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जनावरांच्या दवाखान्यात रिक्त असलेली श्रेणी 1आणि श्रेणी 2 ची पदाची त्वरीत भरती करून पशुधन वाचवावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी पशुसंवर्धन मंत्री ना .सुनील केदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तामामा भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या देण्यात आलेल्या निवेदनात जर सरकारी नवीन भरती करणे सरकारला अश्यक्य असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्याप्रमाणे कंत्राटी नेमणुका करून सेवा पुरविली जात आहे त्याच धर्तीवर जनावरांचे डॉक्टर ची नेमणुका ही कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी अशी रास्त सूचना ही मांडण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जे जनावराचे दवाखाने आहेत, यामधील जवळपास 60 ते 70 अधिकारी आणि कर्मचारी जागा रिक्त आहेत, त्यामुळे त्या त्या भागातील जनावरांना विविध प्रकारचे उपचार करणे अडचणी चे वाटत आहे. त्यासाठी सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेऊन पशुधन आणि शेतकरी यांना वाचविण्यासाठी रिक्त जागा त्वरित भरून सेवा सुरू ठेवावी अन्यथा मनसे याच शेतकऱ्यांसाठी रस्तावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही प्रशांत गिड्डे यांनी दिलेल्या या निवेदनात दिला आहे
सदरचे निवेदन देताना राहुल सुर्वे, संतोष गुळवे, अशोक भांगे, महादेव मांढरे, नितीन महाराज गडदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा