maharashtra day, workers day, shivshahi news,

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार तन्वीर अली पटेल मुद्देमालासह अटक

देशी बनावटीचे दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे, 3 मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल एकुण 2,53,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal pistol possession arrested, karad, satara, police, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी व  अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा डॉ. वैशाली कडुकर यांनी विशेष मोहिम राबवुन विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्याच्यवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना  पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे  शाखा सातारा अरुण देवकर  यांनी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे  पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर  यांनी सहा. पोलीस निरीक्षक रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखाली विशेष पथके तयार करुन कारवाई करण्याचे सुचना दिल्या.

पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर यांच्या सुचने प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांची पथके दिनांक 9 जून 2025 रोजी कराड शहर, कराड तालुका व मसुर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध पेट्रोलींग करीत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार तन्वीर अली पटेल रा. वाघेरी, ता. कराड, जि. सातारा हा त्याच्या साथिदारांचे सोबत त्यांचेकडील चॉकलेटी रंगाचे ॲक्टीवा मोटार सायकल क्रमांक एमएच-50-जी-1775 वरुन गावठी पिस्टलची विक्री करणे करिता कराड ते पुसेसावळी जाणाऱ्या रोडने जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सदर सहा. पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांचे पथकास देवुन मिळाले बातमी प्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने कराड ते पुसेसावळी रोडवर नायरा पेट्रोल पंपा शेजारी सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात अभिलेखावरील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख व त्याचे दोन साथिदार हे मोटार सायकलवरुन येत असताना त्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेवुन त्यांचेकडुन 2 देशी बनावटीचे पिस्टल, 5 जिवंत काडतुसे, 1 मोकळी मॅग्झीन, 3 मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 2,53,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन कराड शहर पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगले बाबत  गुन्हा नोंद करुन कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाई   पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी,  अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, विश्वास शिंगाडे, सफौ. अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर चालक सफौ. शिवाजी गुरव व पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा, व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !