श्री दत्त जयंती महोत्सव व श्री गुरूचरित्र पारायण सोहळा
शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली : शहरातील शिवाजी नगर भागामधील दत्त मंदिरात श्री दत्त जयंती महोत्सव निमित्ताने २५ डिसेंबर सोमवार रोजी छत्रपती संभाजी नगर येथील कु. सावनी शिरीष गोगटे हिच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिच्या गायनामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
श्री दत्त जयंती महोत्सव व श्री गुरूचरित्र पारायण सोहळा २० ते २६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी नगरातील श्री दत्त मंदिर देवस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त २५ डिसेंबर सोमवार रोजी सायंकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत छत्रपती संभाजी नगरातील कु. सावनी शिरीष गोगटे हिच्या भक्तीगितांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सावनी गोगटे हिने विविध रांगाची रागमाला सादर केली. त्यानंतर दत्तात्रयांचे एक पद सादर केले. याचवेळी भजनसंध्या सादर करून भैरविणे कार्यक्रमाची सांगता केली.
तिच्या गायनाला तबला वादक छत्रपती संभाजी नगरातील श्री दत्तात्रय माणिकराव गोगटे व हार्मोनियमवर नागोराव देशपांडे लोहगावकर यांनी साथ दिली. यावेळी शिवाजी नगर दत्त मंदिर संस्थान तर्पेâ तिला शाल, श्रीफळ देवुन तिचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे तबला वादक दत्तात्रय गोगटे व हार्मोनियमन वादक विनायक देशपांडे लोहगावकर यांचाही शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुधीर मुळे यांनी केले. या गायनाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा