नायगाव शहर प्रमुख पदी शिंदे गट शिवसेना शेख अमर लाला यांची नियुक्ती
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील अनेक पक्षांमध्ये काम केल्याची दखल घेऊन नांदेड लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट पक्षाने तरुण कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली आहे नायगाव तालुका शहर प्रमुख शिवसेना प्रमुख लोकसभा निरीक्षक दिलीपराव शिंदे यांच्या हस्ते जयराज पॅलेस मंगल कार्यालय नायगाव या ठिकाणी शेख अमर लाला यांची शिंदे गट शिवसेना नायगाव तालुका शहर प्रमुख पदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती जिल्हाप्रमुख उमेश मुंडे महिला जिल्हाप्रमुख गीता ताई पुरोहित उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद पिंपळे संपर्कप्रमुख गंगाधर बडोरे आणि तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बेलकर उपशहर प्रमुख केशव शिंदे उप शहर प्रमुख शेख निजाम शहर संघटक शेख ताजुद्दीन नायगाव महिला शहर प्रमुख नायगाव विजयमाला गंगावने सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा