ग्रामपंचायत निवडणूक - शेवटच्या दिवशी उमेदवारी भरण्यासाठी झुंबड

 शेवटच्या दिवशी उमेदवारी भरण्यासाठी झुंबड 

कोरोनाचा पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स चे नियम धाब्यावर

grampanchayat nivadnuk, 2021, pandharpur, shivshahi news
grampanchayat nivadnuk

पंढरपूर- (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऑनलाइन एवजी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत असल्याने इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केली होती.यावेळी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह इच्छुक उमेदवारांना देखील करोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स सिंगचा विसर पडल्याचे दिसून आले.
    23 डिसेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत. मात्र, सर्वर डाऊन असल्यामुळे उमेदवारांची मोठी धावपळ झाली. दिवसभर सायबर कॅफे मध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ताटकळत बसावे लागत होते. यात 25 ते 28 असे तीन दिवस शासकीय सुट्टी आल्याने तीन दिवस अर्ज स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी 29 व 30 असे दोनच दिवस उरले.या दोन दिवसात अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी तब्बल तेराशे सत्तावीस अर्ज सादर केले गेले. ऑनलाईन मुळे अर्ज सादर करण्यास होणारा विलंब लक्षात घेता निवडणूक आयोगाने ऑनलाईन एवजी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली व वेळही ५.३० पर्यंत वाढवण्यात आल्याने उमेदवारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बुधवार, ३०रोजी शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केंद्रावर तोबा गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. 
बुधवारी शेवटच्या दिवशी झालेली उमेदवाराची गर्दी लक्षातघेता कोरोना ची भीती शासकीय अधिकारी अथवा उमेदवारांना असल्याचे दिसून येत नव्हते.निवडणूक विभागाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने वरणाचे सर्व नियम पाळत कामकाज सुरू केले. मात्र, ऑनलाइन अर्ज स्विकृती मुळे उमेदवारांचा उडालेला गोंधळ पाहता उमेदवाराची धावपळ सुरू झाली.यातच शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज भरण्यास परवानगी दिल्याने मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरण्यासाठी चारही केंद्रावर उपस्थित होते. यामुळे तहसील कार्यालय, रायगड भवन, पंचायत समिती कृषी भवन, शासकीय धान्य गोडाऊन येथे उमेदवारांची तोबा गर्दी दिसून आली.पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून अद्यापही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत त्यामुळे निवडणूक काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र,त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कोरोनाचा धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंढरपूर येथे अर्ज स्विकृती चारही केंद्रावर शासकीय अधिकारी, कर्मचारी व मतदान प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी यांनी मास्क, सॅनिटायझर चा वापर करीत असेल तरी उमेदवाराची संख्या पाहता त्यांनी टायझर, सोशल डिस्टन्स पाळणे शक्य होत नसल्याचे चित्र दिसून आले. यामुळे कोरुना पुन्हा डोके वर काढण्याची भीती देखील निर्माण झाली आहे.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !