सामाजिक, ऐतिहासिक मराठी चित्रपट साधणार नवीन वर्षाचा मुहूर्त ?
कोरोनामुळे मार्च महिन्यात लागू झालेल्या टाळेबंदी मुळे अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण रखडले होते. राज्य शासनाने अटी व शर्ती च्या आधारे चित्रीकरणाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर अनेक दिग्दर्शकांनी अपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.5 नोव्हेंबर पासून चित्रपटगृहे 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू झाली. मात्र,कोरोनामुळे अजुनही प्रेक्षक म्हणाव्या तितक्या क्षमतेने चित्रपटगृहाकडे फिरकत नसल्याने 2020मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर ही नवे चित्रपट प्रदर्शित करण्याची हिम्मत निर्मात्याने आणि वितरकांनी दाखवली नाही. मात्र,नव्या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान अनेक नवे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये झळकणार याच्या तयारीत आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित'झुंड'ह्या न्यायालयीन वादात असला तरी नव्या वर्षात तोही धडकण्याची शक्यता आहे.हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असले तरी चित्रपट गृह पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावरच मार्च-एप्रिल दरम्यान चित्रपटगृहात झळकतील, असा विश्वास कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि वितरकांना आहे.
2 मे 2019 शास्त्रीय गायक पं. वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. त्यांच्यात जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या 'मी वसंतराव' हा निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित चित्रपट गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोनामुळे तो होऊ शकला नाही. नव्या वर्षात परिस्थिती पाहूनच हा चित्रपट प्रदर्शित होईल, असे या चित्रपटात पं.वसंतराव देशपांडे ची भूमिका साकारणारी त्यांचे नातू व प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी दैनिक'पुढारी'ला सांगितले.अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू साथीदार असलेले सरसेनापती हंबीरराव यांच्या जीवनावरील चित्रपटाची भेट रसिकांना देणार देऊळ बंद पार्ट-२'आता परीक्षा का देवाची या चित्रपटाच्या चित्रीकरणास तरडे यांनी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर प्रारंभ केला. नवीन वर्षात तो झळकेल.
मुंबईतल्या गुन्हेगारी जगताचे वास्तव सांगणाऱ्या'दगडी चाळ भाग-२'चित्रपट 2021 मध्ये तयार झाला आहे.चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावरच नवीन वर्षात चित्रपट प्रदर्शित करण्याचा सध्यातरी विचार असल्याचे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते रत्नकांत जगताप यांनी सांगितले. महेश मांजरेकर यांचा'पांघरूण'हा चित्रपट ही नव्या वर्षात पदार्पणाच्या वाटेवर आहे. राजकुमार तांगडे दिग्दर्शित'चिवटी'आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त'क्षितीज'राज्य शासनाचे तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त'टेन गल्या'हे सामाजिक चित्रपटही 2021 चा मुहूर्त साधणार आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा