सरकार-शेतकरी चर्चा आज
अंतिम तोडगाकडे आंदोलकाचे लक्ष
![]() |
kisan aandolan |
नवी दिल्ली-(प्रतिनिधी) नव्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये बुधवारी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.दिल्लीच्या विज्ञान भवनात दुपारी दोन वाजता चर्चेस प्रारंभ होणार असून त्यात अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारने लागू केलेले तीन शेती ती सुधारणा कायदे शेतकरीविरोधी आहेत. त्यामुळे ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करीत देशभरातील शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.केंद्र सरकारने वारंवार चर्चा करून कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची तयारी दाखविली होती. आंदोलकांनी चर्चेची तयारी दर्शविल्यानंतर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन 30 डिसेंबर रोजी चर्चेचे निमंत्रण दिले. चर्चेमध्ये तीन शेती सुधारणा कायदे, किमान हमीभाव, एपीएम सी व्यवस्था, प्रदूषण नियंत्रण अध्यादेश आणि बीज विषयक कायद्यावर सविस्तर चर्चा केली जाईल, असे केंद्र सरकार तर्फे पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तर आंदोलकांनी चर्चेमध्ये तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करण्याविषयी विचार करणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभावाची कायदेशीर हमी देणे, त्याचप्रमाणे प्रदूषण विषयक अध्यादेश आणि बीज विषयक कायद्यामध्ये सुधारणा करणे या विषयावर चर्चा हवी, अशी विनंती केली आहे.या वेळेच्या चर्चेमध्ये अंतिम तोडगा निघण्याची आशा आहे. मात्र, त्यात आंदोलन पुन्हा आडकाठी आणू शकतात. कारण, कायदे कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाहीत; हे केंद्र सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तर आंदोलकांनी चर्चेच्या अजेंड्यात कायदे रद्द करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्याचा मुद्दा समाविष्ट केला आहे.त्यामुळे कायद्यामध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवून सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा